लातूर : प्रतिनिधी
येथील प्रभाग क्रमांक ९ मध्ये केशवराज शाळा ते डॉ. जटाळ हॉस्पिटलपर्यंतच्या रस्त्याचे कामाचा शुभारंभ प्रभागाच्या माजी नगरसेविकास सपना किसवे, ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक गोविंदपुरकर यांच्या हस्ते करण्यात आला. हा रस्ता अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. प्रभागाच्या माजी नगरसेविका सपना बंडू किसवे यांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडे या कामासाठी सतत पाठपुरावा केल्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला.
त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नगरसेवक अशोक गोविंदपूरकर व माजी नगरसेविका व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सपना बंडू किसवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रभागातील नागरिक डॉ. अमोल जगताप, दीपक डोंगरे, अजय यादव, अजय वागदरे, अॅड. राहुल पांडे, प्रसाद धूम्मा, आशिष गुडे, विधाताई गुडे, पुष्पा कांबळे, जितेंद्र सराफ, अशोक माळवदकर, विनायक सुरवसे, पृथ्वी पवार, सोपान आकनगिरे, नागेश स्वामी, अभिषेक किसवे यांची उपस्थिती होती. या रस्त्याच्या कामास निधी उपलब्ध झाल्याबद्दल प्रभागाच्या वतीने माजी मंत्री आमदार अमित देशमुख साहेब यांचे आभार मानण्यात आले.