26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रप्रवासी बस नदीत कोसळली; २ ठार, २५ जण जखमी

प्रवासी बस नदीत कोसळली; २ ठार, २५ जण जखमी

जळगाव : प्रतिनिधी
प्रवाशांनी भरलेल्या खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. यावल तालुक्यातील फैजपूर-अमोदा मार्गावर मोर नदीच्या पुलाजवळ इंदोरकडून भुसावळकडे येणारी खासगी ट्रॅव्हल्स नदीवरील पुलावरून १५ फूट खोल नदीपात्रात कोसळली. या भीषण दुर्घटनेत २ प्रवासी ठार झाले असून २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात हा भीषण अपघात सकाळी सातच्या सुमारास घडला आहे.

दरम्यान इंदोर येथून खासगी बस भुसावळकडे येत होती. फैजपूर-अमोदा दरम्यान असलेल्या मोर नदीवरील पुलावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर बस पुलाचा कठडा तोडून थेट १५ फूट खोल असलेल्या नदीमध्ये कोसळली. नदीला पाणी नाही. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

माथेरान घाटात अपघात
माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला घाटात अपघात झाला. गुजरात राज्याची पासिंग असलेल्या कारला अपघात घडला. चार प्रवासी पर्यटक यामध्ये प्रवास करीत होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. माथेरान घाटातील जुमापट्टी या रेल्वे स्थानकाच्या वरील वळणावर अपघात घडला सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नसून प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR