मुंबई : राज्यात फडणवीस सरकार सत्तेत येताच आता प्रशासनातही फेरबदल सुरु करण्यात येत असून, प्रशासकीय अधिका-यांच्या बदल्या आणि पदोन्नत्यादेखील देण्यात येत आहे. राज्य सरकारने आज काही अधिका-यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले तर काही अधिका-यांची बदली करण्यात आली. यामध्ये सचिनद्र प्रताप सिंह यांची आयुक्त, शिक्षण पुणे येथे नियुक्ती करण्यात आली. तसेच रुचेश जयवंशी यांना पदोन्नती देण्यात आली.
रुचेश जयवंशी राष्ट्रीय ग्रामीण जीवनन्नोती अभियान, नवी मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना अल्पसंख्याक विभास विभाग, मंत्रालय मुंबईच्या सचिव पदावर नियुक्ती देण्यात आली. रविंद्र बिनवडे यांची नोंदणी महानिरीक्षक व नियंत्रक मुंद्राक शुल्क,पुणे येथे बदली, रणजितसिंह देओल यांची प्रधान सचिव,शालेय शिक्षण व क्रीडा विभागात बदली, डॉ.अशोक करंजकर यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, मुंबई येथे बदली करण्यात आली.
डॉ. प्रशांत नारनवरे यांची सचिव व विशेष चौकशी अधिकारी (२), सामान्य प्रशासन विभाग,मंत्रालय मुंबई या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. सूरज मांढरे यांची आयुक्त कृषी, पुणे या पदावर बदली करण्यात आली. ते यापूर्वी क्रीडा व युवक सेवा विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. प्रदीप पी. यांची आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई येथे बदली केली. यापूर्वी ते महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच माणिक गुरसाळ यांना पदोन्नती देण्यात आली.
सोनिया सेठी सध्या महसूल व वन विभाग, मंत्रालय येथे प्रधान सचिव (मदत व पुनर्वसन ) म्हणून कार्यरत आहेत, त्यांना अपर मुख्य सचिव म्हणून पदोन्नती देण्यात आली. आयएएस अधिकरी निधी चौधरी यांनाही पदोन्नती दिली.समग्र शिक्षा अभियान, मुंबईच्या राज्य प्रकल्प संचालक विमला आर यांनाही पदोन्नती दिली.
शीतल तेली-उगले
यांना मिळाली पदोन्नती
शीतल तेली-उगले, सोलापूर महानगरपालिकेच्या महापालिका आयुक्त पदावर वेतनश्रेणी उन्नत करुन पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक ए. बी. धुळाज यांनाही पदोन्नती मिळाली.