21.9 C
Latur
Friday, February 20, 2026
Homeमनोरंजनप्रसाद ओकच्या नावावर दोन विश्वविक्रमांची नोंद

प्रसाद ओकच्या नावावर दोन विश्वविक्रमांची नोंद

‘धर्मवीर’ चित्रपटासाठी पुरस्कारांनी सन्मानित

मुंबई : मनोरंजन सृष्टीतून आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रसाद ओकचे चाहते खूपच खुश आहेत. प्रसादने खूप मोठे यश मिळवले आहे. प्रसाद ओकचा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट २०२२ ला रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच चित्रपटाने चांगले कलेक्शन देखील केले. ‘धर्मवीर’ चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या चिपटात प्रसाद ओक याने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाचे आजही खूप कौतुक होते.

प्रसाद ओकने त्याला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल एक व्हीडीओ पोस्ट केला आहे. ज्यात सांगितल्याप्रमाणे, ‘धर्मवीर’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे अनेक पुरस्कार मिळाले. ‘धर्मवीर’ चित्रपटाला सर्वांत जास्त पुरस्कार मिळाले आहेत. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ आणि ‘ग्लोबल बुक ऑफ ईक्सलेइन्स ए७ूी’ इंग्लंड रेकॉर्ड’ या दोन्ही रेकॉर्डस्मध्ये या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. प्रसाद ओकला एकाच चित्रपटासाठी एका वर्षात तब्बल १५ पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे दोन विश्वविक्रमांची त्याच्या नावावर नोंद झाली आहे.

‘धर्मवीर’ चित्रपटामुळे प्रसाद ओकचे नशीब चमकले आहे. मिळालेल्या यशामुळे प्रसाद ओकने ‘धर्मवीर’ च्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. ‘धर्मवीर’ चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे आहेत. प्रसाद ओकने मिळवलेल्या या यशामुळे सध्या सर्वत्र त्याचे कौतुक होताना पाहायला मिळत आहे. चाहते, मित्रमंडळी आणि कलाकार त्याच्या या पोस्टवर भरभरून कमेंट्स करत आहेत. त्याला शुभेच्छा देत आहेत, कौतुक करत आहेत.

व्हीडीओमध्ये प्रसाद ओकसोबत त्याची बायको मंजिरी ओक पाहायला मिळाली. आता चाहते प्रसाद ओकच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. प्रसादच्या व्हीडीओवर अमृता खानविलकरने ‘तुझा खूप अभिमान आहे..’ तर अभिनेत्री प्राजक्ता माळीने ‘प्रसाद दा, मनापासून अभिनंदन…’ अशी कमेंट केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR