लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद (छत्रपती संभाजी नगर) इंडीयन कम्युनिटी पटाया व सोनवणे फाऊंडेशन नाशीकच्या वतीने दिला जाणारा फुले-शाहू-आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. त्याबद्दल लसाकम लातूरच्या वतीने प्राचार्य डॉ. गादेकर यांचा सत्कार करण्यात आला.
क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ ‘लसाकम’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक के. डी. उपाडे यांच्या हस्ते शहरातील ‘फकिरा’ निवासस्थानी शाल बुके व पेढा भरवून सहृदयी सत्कार करण्यात आला. यावेळी लसाकमचे विभागीय कार्याध्यक्ष दयानंद कांबळे यांची उपस्थिती होती. ७ जानेवारी रोजी बँकॉक-थायलंड येथील हॉटेल बँकॉक पॅलेसच्या भव्य सभागृहात झालेल्या विश्व साहित्य संमेलनात सदरील पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.