26.6 C
Latur
Monday, March 17, 2025
Homeलातूरप्राचार्य शोभा टोंप अहिल्या नारी गौरव पुरस्कारांने सन्मानीत

प्राचार्य शोभा टोंप अहिल्या नारी गौरव पुरस्कारांने सन्मानीत

लातूर : प्रतिनिधी
चाकूर तालुक्यातील  जानवळ येथील कै. जनार्दनराव राजेमाने आश्रमशाळेत नुकतीच अहिल्याबाई होळकर प्रसारक मंडळ कारेपूर संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी जीवन विकास महिला मंडळ संस्थेच्या सचिव तथा माजी  प्राचार्या शोभा पांडुरंग टोम्पे  यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘अहिल्या नारी’ गौरव पुरस्काराने लातूर जिल्ह्याचे अतिरिक्त्त पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी डॉ. पांडुरंग टोम्पे, दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले, पत्रकार इस्माईल शेख, प्राचार्य निलेश राजेमाने उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शालेय क्रीडा स्पर्धा २०२४ च्या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. तसेच नुकत्याच बहुजन समाज कल्याण विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून विजयश्री खेचून आणन्यात मोलाचा वाटा उचलणा-या काही खेळाडूंचा व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य निलेश राजेमाने यांनी, सूत्रसंचालन प्रा. योगेश कदम तर आभार देवानंद केंद्रे यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR