सोलापूर : प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर विभागाच्या खुर्चीला रयत क्रांती संघटनेच्या वतीने हार घालून निवेदन देण्यात आले प्रतिनिधी- सन २०२४-२५ च्या ऊस गाळप हंगाम दोन महिने चालु होऊनसुद्धा सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून ऊस बिले शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत दिले नाहीत.
त्यासंबंधीचे निवेदन घेऊन प्रादेशिक सहसंचालक (साखर)यांना ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रा. सुहास पाटील व रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले यांचे समवेत रयत क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी आज सोलापूर प्रादेशिक सहसंचालक साखर प्रकाश अष्टेकर यांना निवेदन देण्यासाठी आले असता, कार्यालयामध्ये कोणीही अधिकारी ऊपस्थित नव्हते. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी अधिकारी ऊपस्थित नसल्याचे पाहुन त्यांच्या खुर्चीला हार घालुन खुर्चीला निवेदन देण्यात आले.अनुपस्थित अधिकार्यांवर साखर आयुक्तांनी कारवाई करावी असे प्रा.सुहास पाटील यांनी सुचविले आहे.
सदर निवेदनामध्ये चालु ऊस गाळप हंगाम दोन महिन्यांपासुन बहुतांश साखर कारखान्यांनी ऊस बिले दिलेली नाहीत अशा कारखान्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी.व विलंब झाल्याने १५% व्याजासहीत ऊस ऊत्पादक शेतकर्यांना ऊस बिले जमा करण्यात यावेत.ऊस तोडणी करताना तोडणी वहातुकदार,तोडणी मजुर व ड्रायव्हर यांचेकडून शेतकर्यांची आर्थिक लुट होत आहे.ती त्वरीत थांबवण्यात यावीत.
ऊसाला पहिली ऊचल ३०००/-तीन हजार रूपये प्रति टन देण्यात यावी.या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी रयत क्रांती संघटनेचे हणुमंत गिरी,नामदेव पवार,अमोल वेदपाठक,रूपेश वाघ,राहुल पवार आदी जिल्हा पदाधिकारी ऊपस्थित होते.