23.4 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरप्राध्यापकांच्या सखोल ज्ञानाने विद्यार्थी गुणवान बनावेत 

प्राध्यापकांच्या सखोल ज्ञानाने विद्यार्थी गुणवान बनावेत 

लातूर : प्रतिनिधी
नव्यानेच लागू करण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरण २०२० वर येथील कॉक्सिट महाविद्यालयात प्राध्यापकांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील विविध विषयांच्या तज्ज्ञ प्राध्यापकांनी संगणक शास्त्रातील विविध अभ्यासक्रमासंबंधीचे नवीन शैक्षणिक धोरणाविषयीचे ज्ञान तसेच अभ्यासक्रमाचे स्वरुप इतरांसमोर कथन केले. रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांनी प्राध्यापकांच्या सखोल ज्ञानाने विद्यार्थी गुणवान बनावेत, असे आवाहन केले.
प्राध्यापकांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाविषयी जनजागृती व्हावी, त्यांनी या धोरणानुसार आपापल्या विषयात पारंगत बनावे, यासाठी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांच्या सूचनेवरुन  येथील कॉक्सिट महाविद्यालयात प्राध्यापकांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील होते.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. डी. आर. सोमवंशी, डॉ. व्ही. व्ही. भोसले, ट्रेंिनग व प्लेसमेंट प्रमुख प्रा. कैलास जाधव, डॉ. डी. एच. महामुनी, प्रा. सुषमा मुंडे, प्रा. नितीन वाघमारे यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. एम. आर. पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण देशभर लागू करण्यात आले आहे. त्या धोरणाचा बारकाईने अभ्यास करुन प्रत्येक प्राध्यापक आपापल्या विषयात पारंगत असावा, यासाठी प्रत्येकाने मनापासून प्रयत्न करावेत, प्राध्यापकांनी आपल्या सखोल ज्ञानाचा लाभ विद्यार्थ्यांना देऊन त्यांना गुणवत्तापूर्ण बनवावे, असे आवाहन डॉ. पाटील यांनी यावेळी केले. यावेळी महाविद्यालयातील विविध विभागांतील १०० पेक्षा अधिक प्राध्यापकांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी आपापल्या अभ्यासक्रमातील आणि विषयातील बारकावे उपस्थितांना  सांगितले. कॉक्सिटमध्ये यापूर्वीही अशा परिसंवादांचे आयोजन करुन प्राध्यापकांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण राबविण्याविषयी जनजागृती करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR