अहमदपूर : प्रतिनिधी
येथील विचार विकास मंडळ द्वारा संचलित महात्मा गांधी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. राजेश्री अप्पाराव जाधव यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन जयपूर (राजस्थान) येथील वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर सक्षम सोसायटीतर्फे देण्यात येणारा सन २०२५ चा इंटरनॅशनल वूमन एम्पॉवरमेंट अवॉर्ड २०२५ प्राप्त झाला आहे. प्रा. डॉ .जाधव यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा महाविद्यालयामध्ये सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विचार विकास मंडळाचे अध्यक्ष अॅड.किशनराव बेंडकुळे, सचिव अॅड. पी. डी.कदम, उपाध्यक्ष युवराज तात्यासाहेब पाटील, उपाध्यक्ष विजयकुमार देशमुख, सहसचिव सुरेशराव देशमुख, सहसचिव अॅड. वसंतराव फड, कोषाध्यक्ष रामचंद्रराव शेळके, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.एस.आर.शेळके, स्टाफ सेक्रेटरी डॉ.अनिल कांबळे, डॉ. राजश्री भामरे, डॉ.एस.आर. सुळसुळे, डॉ. यादव सूर्यवंशी, डॉ.डी.एल. बंजारा, डॉ.बालाजी पाटील, प्रा.पी.आर. अर्जुन तसेच महाविद्यालयातील शिािक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. राजेश्री जाधव यांचे अभिनंदन केले आहे.