नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या आणि वायनाड येथील खासदार प्रियांका गांधी-वधेरा यांनी नुकतेच मल्याळम भाषा शिकण्यासाठी क्लास लावला असल्याची माहिती दिली. प्रियांका या वायनाडच्या खासदार आहेत. मल्याळम ही तेथील स्थानिक भाषा आहे. त्यामुळे स्थानिकांशी सहज संवाद साधता यावा म्हणून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. प्रियांका गांधींना इंग्रजी, हिंदीसह फ्रेंच आणि इटालियन या भाषाही येतात. वायनाडमधील पल्लीकन्नू चर्चला भेट दिलेल्या शिष्टमंडळातील ख्रिस्ती पुरोहितांशी त्यांनी फ्रेंच आणि इटालियन भाषेत संवाद साधला होता. एका शिक्षकाच्या मदतीने प्रियांका मल्याळम भाषा आत्मसात करत आहेत. नुकतेच प्रियांका गांधी यांनी वायनाड दौ-यात वडक्कनाड येथे एका सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी त्यांच्या या मल्याळम शिकण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली.