30.3 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeलातूरप्रेमप्रकरणातून मुलावर जीवघेणा हल्ला

प्रेमप्रकरणातून मुलावर जीवघेणा हल्ला

लातूर : प्रतिनिधी
प्रेमात सैराट झालेल्या पोराला गावातील पोरीने चिट्टी पाठवून घराकडे भेटायला बोलावले अन् भेटायला गेलेल्या मुलास मुलीच्या नातेवाईकांनी त्यांच्या घरासमोरच मारहाण करुन हात पाय मोडल्याची घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळी (ब.) येथे घडली असून या प्रकरणी जखमी मुलाच्या वडीलांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात जखमी मुलाचे वडिल उमाकांत यशवंत सोट रा. टाकळी (ब) ता.जि.लातूर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मला अभिषेक व माऊली असे दोन मुले असून दि. २७ ऑक्टोबर रोजी रात्री अंदाजे ८.३० वाजता मी माझी पत्नी व माझा मोठा मुलगा अभिषेक असे आम्ही घरी जेवण करीत बसलो होतो तेव्हा लहान मुलगा माऊली हा घरातून एकटाच बाहेर गेला. त्यानंतर अंदाजे ९.३० वाजण्याच्या सुमारास माझ्या घरी गावातील गोंिवद रंगनाथ डुरे व ओम श्रीमंत खेडकर हे दोघे आले व त्यांनी मला माझी पत्नी अर्चना व मोठा मुलगा अभिषेक यास काठीने व दुचाकीच्या शॉकअपर्सने मारहाण करुन तुमच्या लहान मुलांस आमच्या दारात मारुन टाकले आहे तुम्हांला पण मारुन टाकतो असे म्हणत असताना ंमाझा चुलत भाऊ भाऊसाहेब सोट हे आले त्यांनी आम्हांला मारहाण करीत असल्याची सोडवा सोडव करुन तुम्ही पोलीसांकडे तक्रार केली तर बघेन घेऊ असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली.
 त्यानंतर मी एकास सोबत कमलाकर डुरे यांचे दारात जाऊन पाहीले असता माऊली सोट हा खाली पडला होता त्याचे दोन्ही पायाला, दोन्ही हाताला व नाकातून रक्त येत असल्याचे दिसले. त्यास आम्ही रुग्णालयात नेण्यासाठी उचलत असतानां आम्हास कमलाकर डुरे यानी तुम्ही त्यास रुग्णालयात न्यायचे नाही असे म्हटल्याने आम्ही तेथेच थांबालो थोड्या वेळात तेथे पोलीस आले त्यानंतर पोलीसांचे समोर आम्ही माऊली सोट यास  जीपमध्ये घालून मी भाऊसाहेब सोट, मोठा मुलगा अभिषेक असे आम्ही त्यास उपचारकामी लातूर येथे घेऊन येत असताना मुलगा माऊली यांने आम्हांस सांगीतले की, माझ्याकडे मुलीने चिठ्ठी देऊन भेटण्यासाठी घराकडे बोलाविल्याने मी एकटाच तिच्या घराकडे गेलो. मी रोहीनीच्या घरासमोर अंदाजे ९ वाजेच्या सुमारास गेलो असता तेथे थांबलेले कमलाकर नरहारी डुरे, कुमार विनायक उफाडे, मनोज विनायक उफाडे, गोंिवद रंगनाथ डुरे, ओम श्रीमंत खेडकर, गोपाळ रंगनाथ डुरे सर्व रा. टाकळी ता. जि. लातूर हे सर्व जण माझ्या जवळ आले व त्यांनी तू आमच्या पोरीला पळवून नेतोस का म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सरुवात केली.
यावेळी मला ओम खेडकर, गोपाळ डुरे, कमलाकर डुरे यांनी काठीने व गोविंद डुरे, मनोज उफाडे यांनी शॉकअपर्सचे रॉडने जीवे मारण्याचे उद्देशाने मारहाण केली. मी जोरजोराने ओरडत होतो त्यावेळी गावातील अनेक लोक तेथे जमले पण भांडण सोडविण्यासाठी कोणीही समोर येत नव्हते. मला मारहाण करीत असतानां त्यांनी माझ्या दोन्ही पायाचे नळयावर मारुन फॅक्चर केले व दोन्ही हातावर, डोक्यात, पाठीवर व इतर ठिकाणी काठीने व रॉडने मारहाण केली. मला बराच वेळ मारहाण केल्यानंतर वरील सर्वजण चला हा मेला आता याच्या घराकडे जाऊ असे म्हणून माझ्यापासून ते सर्वजन निघून गेले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत सांगीतले. या प्रकरणी पोलीसांनी दि. १ नोव्हेंबर रोजी मारहाण करणा-या उपरोक्त सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो. नि. सुधाकर देडे हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR