सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालय व ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय सेलू येथे प्रेसिडेन्शिअल परीक्षेत प्रथम येणा-या विद्यार्थ्यांस ऑरेंज कॅप व द्वितीय विद्यार्थ्यास येल्लो कॅप देऊन सन्मानित करण्यात आले.
अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, उत्कर्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास ताठे, ज्ञानतीर्थ मुख्याध्यापक हरिभाऊ कांबळे तसेच पालक उपस्थित होते. इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयाच्या प्रत्येकी ५० गुणांची परीक्षा होती. यापैकी जो सर्वात जास्त गुण घेईल त्याला ऑरेंज व द्वितीय क्रमांकाला येल्लो कॅपने सन्मानित करण्यात आले. डॉ. रोडगे यांनी सध्याचे शिक्षण व त्यामध्ये होत असलेला बदल सांगितला. काळानुसार आपणही बदलले पाहिजे असेही ते म्हणाले.
मार्गदर्शना नंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये इयत्ता १ली मधून शंभूराजे वाडेकर, शिवांश लाटे, इयत्ता २री विराज मोरे, विराट पावडे, इयत्ता ३री वेदिका लहाने, कैवल्य रोडगे, इयत्ता ४थी मधून समर्थ चव्हाण, सार्थक गव्हाणे, इयत्ता ५वी मधून वैष्णवी क्षीरसागर, आराध्या निलवर्ण, इयत्ता ६वी मधून तुनुश्री डख, अनुष्का आचणे, इयत्ता ७वी मधून श्रेया चव्हाण, अनिकेत गोरे, ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयातून इयत्ता ८वी मधून अंजली खेडेकर, साक्षी कांबळे, इयत्ता ९वी मधून कृष्णा रासवे, सई सोनटक्के, इयत्ता १०वी मधून श्रावणी सोळंके, बालाजी सूर्यवंशी या विद्यार्थ्यांना ऑरेंज व येल्लो कॅप मिळाल्या. सूत्रसंचालन संदीप आकात यांनी तर आभार दिगंबर टाके यांनी केले. यशस्वीतेसाठी उत्कर्ष व ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी परिश्रम घेतले.