31.9 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रफडणवीस बीड जिल्ह्याच्या दौ-यावर

फडणवीस बीड जिल्ह्याच्या दौ-यावर

धनंजय मुंडेंवर शस्त्रक्रिया

बीड : प्रतिनिधी
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराड खंडणी प्रकरण, विविध हत्या आणि मारहाणीच्या वृत्तांमुळे बीड जिल्हा धगधगतो आहे. बीडचा बिहार झाल्याचा दावा केला जात आहे. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीबद्दल सत्ताधारी नेत्यांसह विरोधकांकडून टीका केली जात असताना मुख्यमंत्र्यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा असताना धनंजय मुंडे मात्र सुटीवर असल्याचे समोर आले आहे. स्वत: धनंजय मुंडेंनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे पुढील चार ते पाच दिवस भेटता येणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीसांची भेट टाळण्यासाठी हा प्रकार घडल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात शिंपोरा ते खुंटेफळ योजनेतील बोगद्याच्या कामाचे आणि श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिर बांधकामाचे भूमिपूजन होणार आहे. मात्र धनंजय मुंडे शस्त्रक्रियेमुळे या कार्यक्रमापासून दूर राहिले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR