28.4 C
Latur
Friday, May 16, 2025
Homeलातूरफुटलेल्या उजव्या कालव्याची तात्काळ दुरुस्ती करावी 

फुटलेल्या उजव्या कालव्याची तात्काळ दुरुस्ती करावी 

लातूर : प्रतिनिधी
मांजरा प्रकल्प उजवा कालव्यामधील ६१ कि. मी. मध्ये मांजरी, सामनगाव जलसेतूजवळ दि. १६ मे रोजी पहाटे कालवा फुटून शेतीचे नुकसान  होवून पाण्याची नासाडी झाली आहे. हा कालवा तात्काळ  दुरुस्त करावा व भविष्यात अशा घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी, असे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचे महत्त्व खुप आहे. गावांसाठी व शेतीसाठी पाण्याची गरज लक्षात घेवून कालव्याची देखभाल, दुरूस्ती करणे व वेळो वेळी तांत्रिक बाबीवर लक्ष ठेवणे गरजेचे होते.
मात्र संबंधित विभागाने ती काळजी घेतल्याचे दिसून येत नाही, असे  ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे मांजरी, सामनगाव जलसेतूजवळ फुटलेला हा कालवा तात्काळ  दुरूस्त करावा व भविष्यात अशा घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी, असे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.
माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या सुचनेनुसार प्रत्यक्ष मांजरी, सामनगाव जलसेतूजवळ घटनास्थळी शिष्टमंडळाने भेट देवून पाहणी केली. या शिष्टमंडळात विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोकराव काळे, विलास कारखान्याचे व्हाईस चेअरमन माजी आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय देशमुख, मांजरा कारखाना संचालक कैलास पाटील, विलास कारखाना संचालक अनंत बारबोले, अंगद सुरवसे, किशोर गायकवाड, बिभीषण सुरवसे, अभिजीत बुलबुले, गजानन बुलबुले, रोहन झुंजारे, संजय होळकर यांचा समावेश होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR