34.5 C
Latur
Thursday, April 3, 2025
Homeपरभणीफुलकळस ते शिखर शिंगणापूर कावड यात्रेचे प्रस्थान

फुलकळस ते शिखर शिंगणापूर कावड यात्रेचे प्रस्थान

ताडकळस : येथुन जवळच असलेल्या फुलकळस येथुन मागील २० वर्षापासून राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या मार्गदर्शनातून अखंडपणे चालत आलेली कावड यात्रा फुलकळस येथील श्री.त्र्यंबकेश्वर महादेव भक्त बबन सरकाळे व सरकाळे परिवाराच्या वतीने मानाच्या कावडीसह गावातील ७ ते १० कावड यात्रांचे दि.३० मार्च रोजी गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर फुलकळस ते श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूरकडे (मोठा महादेव) कडे प्रस्थान झाले.

फुलकळस, रावराजुर, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, नातेपुते, पंढरपूर, शिखर शिंगणापूर, कपिलाधार गावांतून श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे मोठा महादेव कावड यात्रा जाते. फुलकळस येथील कावड यात्रेला २० वर्षांची परंपरा आहे. सरकाळे यांच्या मार्गदर्शनात १३ दिवसांचा या कावडीचा प्रवास श्रीक्षेत्र शिंगणापूरपर्यंत असतो.

या कावड पद यात्रेमध्ये प्रभाय्या स्वामी, नरहरी शिराळे, गंगाधर रेडे, माणिक शिराळे, देवानंद शेटे, दगडोबा पांचाळ, संभाजी नावकीकर, गंगाधर उघडे, माधव स्वामी, सुभाष महाजन, दत्ता जाधव, शिवशंकर सोनटक्के, बबन मिटकरी, विनोद टेकाळे, भास्कर चौधरी, भाऊसाहेब आवटे, बाळासाहेब टोंगडे, विजय शिराळे, माधव शिराळे, कृष्णा विभुते, गंगाधर गव्हाण, जगन्नाथ घोगरे, देवी मंदिर, कैलास राहटकर, मारुती शिराळे, शिवाजी शिराळे, कैलास सोनटक्के राजेश कुबडे, गोपाळ जगाडे, तुकाराम कुबडे, संतोष थळपते, दिगंबर शिराळे, गोविंद शेट्टे, शिवाजी यादव, पूरबाजी शिराळे, राजेश लोखंडे यांच्या वतीने या कावड पदयात्रेमध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

या शिखर शिंगणापूर कावड यात्रेचा समारोप फुलकळस येथील त्रंबकेश्वर महादेव मंदिर येथे नारायण शिराळे यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करून करण्यात येतो. या कावड यात्रेमध्ये संपूर्ण फुलकळस ग्रामस्थ सहभाग घेत असतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR