25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरफुलांचे उत्पादन कमी झाल्याने दर वधारले

फुलांचे उत्पादन कमी झाल्याने दर वधारले

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात तापमानाचा पारा ४४ अंशांवर पोहोचला असून, याचा परिणाम फूल उत्पादनावर झालेला दिसत आहे. कडक उन्हात फुलाची कळी उमलेनासी झाल्यानं फुलांचा बहर कोमेजला आहे. उन्हाची तीव्रता खूप असल्याने फुलांची आवक घटली आहे. अशातच मागणी वाढल्याने फुलांच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी बाजारात एन सिझनमध्ये बाजारात फुलांची आवक कमी होत आहे. बाजारात झेंडू फुलाला ६० ते ८० रुपये प्रतिकिलो असा भाव मिळत आहे. तर हाराची किंमत ३० ते ६० रुपये आहे.

तर दुसरीकडे सध्या कड़क उन्हाळा असल्यामुळे फुलं विक्रीचा व्यवसाय करणे जिकिरीचे बनले आहे. व्यवसाय करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.ग्राहक सुकलेल्या फुलांचा हार विकत घेत नाहीत.अर्ध्या किमतीला फुलांची ग्राहक मागणी करतात. तसेच ग्राहकांना ताजेतवाने फुले लागतात. त्यामुळे कडक उन्हाळ्यामध्ये फुले टिकविणे मोठे अवघड काम बनले असल्याचे फूल विक्रेते यांनी सांगीतले.दरवर्षी उन्हाळ्यामध्ये लग्न समारंभात फुलांची मागणी वाढते, यंदा पुढील ५८ मुहूर्त नसल्यामुळे मागणी कमी, चांगल्या फुलांची आवक कमी तसेच कृत्रिम फुलांचाच वापर जास्त करीत असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

बाजारात विक्रीस उपलब्ध असलेली नकली फुले, गजरे व वेणी यामुळे खरी फुले संकटात सापडली असताना फूल विक्रेत्यांसमोर दुसरं आव्हान उभे राहिले आहे. दुकानदारांना सकाळ, दुपार आणि संध्याकाळ फूल तसेच त्यापासून तयार केलेल्या हार, वेणी, गजरा यावर पाणी मारावे लागत आहे.सजावटीच्या फुलांना उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असते. सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात लागणारे जरबेरा, डच गुलाब, कार्नेशन, आर्किड, लिलियममध्ये आशियाटिक, ओरिएन्टल, जिप्सोफिलिया, गोल्डन रॉड, ग्लॅडिओलस या फुलांना उन्हाळ्यात जास्त मागणी असते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR