डाऊन डिटेक्टरवर वापरकर्त्यांची तक्रार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सोशल मॅसेजिंग ऍप व्हॉट्सऍप आणि फेसबुक मेसेंजर आज जगभरातील वेगवेगळ््या ठिकाणी डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला. अनेक वापरकर्त्यांना ऍपवरून मेसेज पाठवण्यास अडचण येत असल्याने त्यांनी डाऊन डिटेक्टरवर याबद्दल तक्रार केली आहे. जगभरातील अनेक ठिकाणी वापरकर्त्यांना या अडचणीचा सामना करावा लागला. फक्त स्मार्टफोन्सच नाही तर वापरकर्त्यांना संगणक आणि लॅपटॉपवरदेखील हे ऍप वापरण्यात अडचणीचा सामना करावा लागला.
ऑनलाइन आउटेजबद्दल अपडेट देणा-या डाउनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार बातमी लिहिण्यापर्यंत अमेरिकेत व्हॉट्सऍपबद्दल ४००० हून अधिक आणि भारतात १०००० हून अधिक वापरकर्त्यांनी तक्रारी नोंदवल्या. मेटाने मात्र अद्याप या समस्येबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही तर अमेरिकेत १ हजार वापरकर्त्यानी फेसबुक मेसेंजर वापरतानाही अडचण येत असल्याचे म्हटले आहे.