16.9 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeलातूरबँक ऑफ महाराष्ट्रला राजभाषेचा कीर्ती पुरस्कार

बँक ऑफ महाराष्ट्रला राजभाषेचा कीर्ती पुरस्कार

लातूर : प्रतिनिधी
बँक ऑफ महाराष्ट्रला भारतसरकारच्या गृह मंत्रालयातर्फे राजभाषेचा सर्वोच्च सन्मान कीर्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षी बँकेला सर्वश्रेष्ठ गृह पत्रिका या श्रेणीमध्ये हा पुरस्कार मिळाला.  हा पुरस्कार १४ सप्टेंबर रोजी भारत मंडपम, नई दिल्ली येथे आयोजित हिंदी दिन समारोहामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रला प्रदान करण्यात आला.  गृह आणि सहकार मंत्री मित शाह या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते,
बँकेचे कार्यकारी संचालक आशीष पाण्डेय यांना  श्रेष्ठ गृह पत्रिकासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह तसेच गृह मंत्रालयाच्या सचिव (राजभाषा) सुश्री अंशुली आर्या देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाव्यवस्थापक सुश्री संतोष दुलड़ आणि उपमहाव्यवस्थापक डॉ. राजेन्द्र श्रीवास्तव आणि  इतर प्राधिकारी देखिल उपस्थित  होते.यावेळी देशभरातील विविध सरकारी कार्यालये, उपक्रम आणि बँकांचे उच्च प्राधिकारी आणि राजभाषा अधिकारीही या समारंभात उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR