32.5 C
Latur
Monday, April 7, 2025
Homeराष्ट्रीयबंगळुरू शहरात धावते ‘स्मूच कॅब’?

बंगळुरू शहरात धावते ‘स्मूच कॅब’?

बंगळूरू : नुकतीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये ‘स्मूच कॅब’ धावू लागल्याची बातमी समोर आली आहे. विशेषत: कपलसाठी ही खासगी कॅब सेवा असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना प्रवासादरम्यान खासगी वेळ घालवण्याची संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

कारण संपूर्ण जगाला बंगळुरूची वाहतूक स्थिती माहित आहे. बहुतेक लोकांना स्मूच कॅब ही सर्विस योग्य वाटू लागली होती. या कॅबशी संबंधित काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. फोटोमध्ये कॅब ड्रायव्हर बॅक व् ू मिररवर टेप लावताना दाखवण्यात आले आहे. जेणेकरुन त्याला त्याच्या मागे चालणारे क्षण दिसू नयेत. मात्र, हे सर्व खोटे असल्याचे समोर आले आहे. एका एक्स सोशल मीडिया यूजरने दावा केला होता की त्याने ही ‘स्मूच कॅब’ पाहिली. या यूजरने ‘आम्ही स्मूच कॅब पाहिली??? आत काय पाहिले हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. पण मी प्रायव्हसीसाठी १० पैकी १० गुण देईन’ या आशयाची पोस्ट केली. यावर, मीम-आधारित डेटिंग अ‍ॅपने रिप्लाय देत ‘आताच बुक करा! केवळ १ एप्रिलपर्यंत ही सेवा उपलब्ध आहे’ असे म्हटले. वरवर पाहता हा एप्रिल फूलचा विनोद होता.

सोशल मीडिया पोस्टमध्ये स्मूच कॅबच्या नियम आणि अटी शेअर करताना ही कॅब सेवा गोपनीयतेकडे लक्ष देते, असे म्हटले होते. चालकांना प्रवास करणा-या ग्राहकाची तक्रार करण्याची परवानगी नाही. वाहनात रेकॉर्डिंग नसल्याचेही सांगण्यात आले. वाहनचालकांनी स्वत:च्या व्यवसायात लक्ष घालावे, असेही सांगण्यात आले. प्रवाशांना आवाजाची पातळी ७० डेसिबलच्या खाली ठेवण्याचा सल्ला देण्यात आला, अन्यथा चालकाला आवाज येईल. एखाद्या प्रवाशाच्या कुटुंबीयांनी त्याला कॅबमध्ये तर त्याला नाटक करावे लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR