27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रबच्चू कडू यांचा पराभव, अचलपुरात धक्कादायक निकाल

बच्चू कडू यांचा पराभव, अचलपुरात धक्कादायक निकाल

अचलपुर : महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीचे निकाल ( २३ नोव्हेंबर ) अखेर आज शनिवारी जाहीर होत आहे. राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले होते. राज्यातील २८८ विधानसभा निवडणूकीसाठीची मतमोजणी सुरु झाली आहे. आता एकामागोमाग निकाल जाहीर होत आहेत. अचलपूर येथून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर महायुती सोबत येणे पसंद केले होते. परंतू महायुती आघाडीत राहूनही बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करणे सुरुच ठेवले होते. लोकसभा निवडणूकीच्या वेळी देखील बच्चू कडू यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रचार करीत त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न केला होता. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा लोकसभेत नंतर पराभव झाला होता.

बच्चू कडू यांचा पराभव
आता विधानसभा निवडणूकीत अचलपूर येथून बच्चू कडू यांचा अनपेक्षित धक्कादायक पराभव झाला आहे. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार प्रवीण वसंतराव तायडे यांचा विजय झाला असून ते १८,४८२ मतांनी आघाडीवर आहेत. साल २०१९ मध्ये विधानसभा निवडणूकीत अचलपूर मध्ये प्रहार जनशक्ती संघटनेचे बच्चू कडू यांचा विजय झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR