बनावट ग्राहक पाठवून लॉजवरील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

कळंब नायगाव शिवारातील लॉजवर छापा; दोन महिलांची सुटका, दोघावर गुन्हा
धाराशिव : प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील नायगाव शिवारात एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या व्यवसायाचा पर्दाफाश केला. ही कारवाई शिराढोण पोलिसांनी गुरुवारी (दि.११) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास केली. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शिराढोण पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कोळेकर यांच्या पथकाने शिराढोण पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी गुरुवारी (दि.११) गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नायगाव शिवारातील नायगाव ते मुरुडकडे जाणारे रोडवर रॉयल लॉज येथे हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन त्या लॉजवर सायंकाळी ६.१६ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी लॉजमध्ये दोन महिला आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता आरोपी अक्षय दादासाहेब घोगरे, लॉज मॅनेजर अजय अच्युत रसाळ, दोघे रा. मुरुड ता. जि. लातूर यांचे सांगण्यावरुन त्या महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करत होते. व आरोपी दोघेजण त्यावर स्वत:ची उपजिवीका करत आहेत असे समजले.

यावरुन पथकाने आरोपींना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोन, नोंदीचे रजिस्टर, रोख ५ हजार ३०० रुपये व निरोधची पाकीट असा एकुण १५ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणा-या लॉजवरील त्या महिलांची सुटका करुन आरोपी अक्षय दादासाहेब घोगरे, लॉज मॅनेजर अजय अच्युत रसाळ, यांचेविरुध्द गुरनं १४१/२०२६ बी.एन.एस सह १४३, १४४(२), ३ (५) सह कलम ३, ४, ५, ६ मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news