31.1 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रबनावट पनीर निर्माण करणा-­यांचे परवाने होणार रद्द; नरहरी झिरवाळ यांचे निर्देश

बनावट पनीर निर्माण करणा-­यांचे परवाने होणार रद्द; नरहरी झिरवाळ यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी
बनावट पनीर किंवा पनीर ऐवजी चीज अ‍ॅनालॉगचा वापर होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. म्हणूनच एफडीएने आता आपला मोर्चा पनीर विक्रेत्यांकडे वळवला असून ग्राहकांची फसवणूक करर्णा­यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, पनीर हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. विशेषत: लहान मुलांना हा पदार्थ खूपच आवडतो. त्यामुळे पनीरची मागणी वाढत आहे. मात्र काही हॉटेलमध्ये ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे दिसून येत आहे. बनावट पनीर किंवा पनीर ऐवजी चीज अ‍ॅनालॉगचा वापर होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. म्हणूनच एफडीएने आता आपला मोर्चा पनीर विक्रेत्यांकडे वळवला असून ग्राहकांची फसवणूक करर्णा­यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पनीर ऐवजी चीज अ‍ॅनालॉगच्या होणा-या गैरवापराविरोधात कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. ग्राहकांना आपण ते जे अन्न खातात त्याबद्दल योग्य निर्णय व निवड करण्यासाठी अन्न पदार्थांतील घटक पदार्थांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. अन्न व सुरक्षा मानके (लेबलिंग आणि डिस्प्ले नियमन) २०२० मधील प्रकरण ३ मधील नियमन ९ (६) नुसार अन्न व्यावसायिकाने ग्राहकांना अन्न पदार्थांची विक्री करताना पोषण संबंधित माहिती तसेच त्यातील घटकांची माहिती व संदेश प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. तसे न करता ग्राहकांची फसवणूक केली जात असेल तर आता एफडीए कठोर कारवाई करणार आहे.

ग्राहकाच्या हिताचे रक्षण करण्याकरिता रेस्टॉरंट, हॉटेल, कॅटरर्स व फास्ट फूड आस्थापनांवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. यामध्ये पनीर ऐवजी चीन अ‍ॅनालॉगचा वापर होत असल्यास त्याबाबतच्या घटक पदार्थांची माहिती इलेक्ट्रॉनिक ऑर्डर मशीन, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड, मेनू कार्ड इत्यादींवर नमूद करणे आवश्यक आहे. या पृष्ठभूमीवर सर्व संबंधित अधिर्का­यांना व्यावसायिकांचे खरेदी बिल्स तपासून कोणतीही फसवणूक किंवा दिशाभूल आढळल्यास सखोल तपासणी करून अन्न सुरक्षा व मानके अधिनियमानुसार परवाना निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR