25.5 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeअंतरराष्ट्रीयबर्दाश्त नही करेंगे; इस्रायल, ट्रम्प यांना सौदीची धमकी!

बर्दाश्त नही करेंगे; इस्रायल, ट्रम्प यांना सौदीची धमकी!

 

तेहरान : वृत्तसंस्था
पॅलेस्टाइन राज्याच्या स्थापनेशिवाय आपण इस्रायलसोबत कुठलेही संबंध प्रस्थापित करणार नाही, असे सौदी अरेबियाने बुधवारी (५ फेब्रुवारी) एका निवेदनातून स्पष्ट केले आहे. महत्वाचे म्हणजे, सौदीची ही प्रतिक्रिया अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानानंतर आली आहे. आता सौदी अरेबिया पॅलेस्टिनी राज्याची मागणी करत नाही, असा दावा ट्रम्प यांनी केला होता.

अमेरिका युद्धात उद्धवस्त झालेल्या गाझा पट्टीवर कब्जा करेल आणि तिचा आर्थिक पुनर्विकास करेल, अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली होती. एवढेच नाही तर, पॅलेस्टिनी नागरिकांना दुस-या ठिकाणी वसविल्यानंतर, अमेरिका गाझावर आपले नियंत्रण प्रस्थापित करेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले होते.

ट्रम्प यांच्या या विधानानंतर, सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचीही प्रतिक्रिया आली आहे. सौदीने म्हटले आहे की, युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी स्पष्टपणे राज्याच्या स्थितीची पुष्टी केली आहे. सौदी अरेबियाची भूमिका ठाम आहे आणि पॅलेस्टिनींना त्यांच्या भूमीवरून विस्थापित करण्याचा कोणताही प्रयत्न सौदी अरेबिया सहन करणार नाही. सौदी अरेबिया पॅलेस्टिनी लोकांप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे आणि पॅलेस्टिनी राज्याच्या स्थापनेशिवाय इस्रायलसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध प्रस्थापित करण्याची शक्यता पूर्णपणे नाकारतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR