30.5 C
Latur
Friday, February 28, 2025
Homeमुख्य बातम्याबर्फवृष्टी, हिमकडा कोसळला ५७ मजूर बर्फाखाली दबले!

बर्फवृष्टी, हिमकडा कोसळला ५७ मजूर बर्फाखाली दबले!

 

चमोली : वृत्तसंस्था
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात प्रचंड बर्फवृष्टी सुरू आहे. त्यातच एक दुर्दैवी घटना घडली. बद्रीनाथपासून ४ किमी अंतरावर असलेल्या माणा गावावर हिमकडा कोसळला आहे. या घटनेत बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनचे ५७ कामगार बर्फाखाली दबले गेले आहेत. १० कामगारांना बाहेर काढण्यात यश आले असून, उर्वरित मजुरांचा युद्ध पातळीवर शोध सुरू करण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये चामोली जिल्हा आहे. या जिल्ह्यात माणा नावाचे गाव आहे, हे गाव भारत आणि चीन सीमेजवळ आहे. बद्रीनाथपासून हे गाव चार किमी अंतरावर आहे.

बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे बीआरओचे मजूर रस्त्यावरील बर्फाचे थर मोकळे करण्याचे काम करत आहेत. बद्रीनाथहून माणाकडे जाणा-या माणा गेटजवळ बीआरओची छावणी आहे. तिथेच अचानक हिमस्खलन झाले. हिमकडा छावणीवर कोसळला आणि ५७ कामगार गाडले गेले.

तातडीने शोध आणि मदत कार्य हाती घेण्यात आले. १० कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. जोशीमठ येथील हेलिपॅडवरून एसडीआरएफच्या पथकाला रवाना करण्यात आले. त्याचबरोबर एनडीआरएफच्या जवानांचीही मदत घेतली जात आहे. प्रचंड बर्फवृष्टी होत असून, बद्रीनाथला जाणारा रस्ता जोशीमठापासून पुढे हनुमान चुट्टीपर्यंत बंद आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR