23.8 C
Latur
Monday, August 11, 2025
Homeमहाराष्ट्रबस-कारचा भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी

बस-कारचा भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी

बीड : प्रतिनिधी
प्रवाशांना घेऊन जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. तेलगाव-धारूर राष्ट्रीय महामार्गावरील चोरंबाजवळ भीषण अपघात झाला असून अपघातात कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यातील तेलगाव-धारूर राष्ट्रीय महामार्गावरील चोरंबाजवळ एसटी बस व कारचा अपघात झाला आहे. ही घटना काल घडली असून या अपघातात कारमधील दोघे जखमी झाले आहेत. पंढरपूरहून माजलगावकडे जाणा-या कारला माजलगाव-कोल्हापूर एसटी बसने चोरंबा गावाजवळील अरुंद पुलावर जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

बसने कारला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील गोपीनाथ देशमुख व ज्योती देशमुख हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत कारमधील जखमींना बाहेर काढले. यानंतर त्यांना धारूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR