22.2 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeअंतरराष्ट्रीयबस-ट्रकची जोरदार धडक, ४१ प्रवासी ठार

बस-ट्रकची जोरदार धडक, ४१ प्रवासी ठार

मेक्सिको : वृत्तसंस्था
मेक्सिकोमध्ये बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली, त्यानंतर बसने पेट घेतला. यात ४१ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी एस्कार्सेगा शहराजवळ हा अपघात झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमी प्रवाशांचे प्राण धोक्याबाहेर आहेत.
दरम्यान, मीडिया रिपोर्टस्नुसार, बस कॅनकुनहून तबास्कोला जात होती. अपघात कसा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र बस अपघातानंतर पूर्णपणे जळून खाक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ४८ प्रवाशांना घेऊन जाणा-या बसची आणि ट्रकची धडक झाली. धडकेनंतर बसने क्षणात पेट घेतला. बस संपूर्ण जळाली. अपघाताची माहिती देताना ताबास्कोच्या कोमलकाल्कोचे महापौर ओव्हिडिओ पेराल्टा यांनी म्हणाले, आम्ही आवश्यक मदत पुरवण्यासाठी स्थानिक अधिका-यांना घटनास्थळी पाठवले आहे. आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बस ऑपरेटर टूर्स अकोस्टा यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी गाडीत सुमारे ४८ प्रवासी होते. कंपनीने फेसबुक पोस्टमध्ये या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. बस वेग मर्यादेत धावत होती आणि अपघाताचे कारण शोधण्यासाठी ते अधिका-यांना पूर्ण सहकार्य करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR