32.5 C
Latur
Monday, March 31, 2025
Homeअंतरराष्ट्रीयबांगलादेशात वायुसेनेच्या तळावर जमावाचा हल्ला

बांगलादेशात वायुसेनेच्या तळावर जमावाचा हल्ला

कॉक्स बाजार : वृत्तसंस्था
बांगलादेशच्या हवाई दलाच्या तळावर मोठा हल्ला झाला आहे. हे एअरबेस कॉक्स बाजार येथे आहे. हल्ला झाल्यानंतर लगेचच हवाई दलाच्या कर्मचा-यांनी कारवाई केली. हवाई दलाने केलेल्या कारवाईमध्ये १ जण ठार, अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

बांगलादेश सशस्त्र दलाच्या मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने सांगितले की, कॉक्स बाजारमधील हवाई दलाच्या तळाशेजारी असलेल्या समिती पारा येथील काही लोकांनी हा हल्ला केला. बांगलादेश हवाई दल कारवाई करत आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ११:३० वाजता हवाई दलाच्या जवानांनी निदर्शकांवर गोळीबार केला.

मिळालेल्या माहितीनुसार, उपायुक्तांनी समिती पाराच्या लोकांना हवाई दलाचा परिसर सोडून खुरुष्कुल गृहनिर्माण प्रकल्पात जाण्याचे आदेश दिले होते. यानंतर लोकांच्या एका गटाने एअरबेसवर हल्ला केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR