16.8 C
Latur
Friday, November 22, 2024
HomeUncategorizedबाबाजानी दुर्राणी शरद पवार गटात

बाबाजानी दुर्राणी शरद पवार गटात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाचे माजी विधानपरिषद आमदार व परभणीतील नेते बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवार गटाची साथ सोडून शरद पवार गटात घरवापसी केली. याचवेळी इतरही अनेकजण या मानसिकतेत असल्याचे सूतोवाच दुर्राणी यांनी केले. त्यामुळे अजित पवार गटाची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे एका जाहीर कार्यक्रमात शरद पवारांच्या उपस्थितीत बाबाजानी दुर्राणी यांचा पक्षात पुन्हा प्रवेश झाला. यावेळी यावेळी माजी मंत्री राजेश टोपे उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. यावेळी दुर्राणी यांनी सूचक शब्दांत अजित पवार गटातील परिस्थितीबाबत दावे केले. यावेळी त्यांनी नाईलाजास्तव अजित पवार गटात गेल्याचे विधान केले. १९८० पासून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आलो आहे. चरख्यापासून घड्याळाच्या चिन्हापर्यंत मी त्यांच्याबरोबरच राहिलो.

परभणीत राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. पक्ष फुटल्याबरोबर मी शरद पवारांसोबतच राहिलो. पण दोन महिन्यांनंतर काही कारणास्तव काही लोकांच्या सांगण्यावरून तिकडे गेलो. मी एवढेच सांगेन की शरद पवारांना सोडून गेलेले अनेक लोक मी माझ्या आयुष्यात पाहिले. ते पुन्हा विधानभवन परिसरात दिसले नाहीत. ते शून्य झाले. बरे झाले मी शून्य होण्याआधीच आलो, असेही त्यांनी म्हटले.

अजित पवारांना
बिहारमध्येही धक्का
माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी आज अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेली असतानाच बिहारमध्येही अजित पवार यांना धक्का बसला आहे. बिहारमधील राहत कादरी यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बिहारमध्येही भगदाड पडले आहे. कादरी हे बिहार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR