22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रबाबा रामदेव यांनी सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त मागितली माफी

बाबा रामदेव यांनी सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त मागितली माफी

पतंजलीच्या जाहिरातींशी संबंधित प्रकरण!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाने दिशाभूल करणा-या जाहिरातीप्रकरणी पतंजली आयुर्वेदला फटकारले होते आणि योगगुरू बाबा रामदेव तसेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना हजर होण्यास सांगितले होते. हे दोघेही आज सर्वोच्च न्यायालयात हजर झाले. सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर दोघांनीही न्यायालयाकडे बिनशर्त माफी मागितली.

सुनावणी दरम्यान, बाबा रामदेव यांचे वकील म्हणाले, अशा जाहिरातीसाठी आम्ही माफी मागतो. आपल्या आदेशानंतर, स्वत: योगगुरू बाबा रामदेव न्यायालयात आले आहेत. ते माफी मागत आहेत आणि आपण त्यांची माफी रेकॉर्डमध्ये घेऊ शकता.
बाबा रामदेवांचे वकील म्हणाले, आम्ही न्यायालयापासून पळत नाही. मी हे काही पॅरेग्राफ वाचू शकतो? मी हान जोडून असे म्हणू शकतो का, की जेन्टलमन स्वत: न्यायालयात हजर आहेत आणि न्यायालय त्यांची माफी नोंदवू शकते? सुनावणी वेळी पतंजलीचे वकील दिशाभूल करणा-या जाहिरातींसंदर्भात बोलताना म्हणाले, आमच्या माध्यम विभागाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती नव्हती.

त्यामुळे अशी जाहिरात गेली. यावर, यासंदर्भात आपल्याला माहिती नव्हती असे गृहित धरणे अवघड आहे, असे न्यायमूर्ती अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या पीठाने म्हटले आहे.

तत्पूर्वी, पतंजलीने दिशाभूल करणा-या जाहिराती मागे घ्याव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०२३ मध्येच दिले होते. तसेच, जर असे झाले नाही, तर आम्ही पुन्हा अ‍ॅक्शन घेऊ. अशा स्थितीत पतंजलीच्या प्रत्येक जाहिरातीवर १ कोटी रुपये एवढा दंड लावला जाईल, असेही न्यायालयाने म्हटले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR