29.1 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeसोलापूरबायोमेडिकल वेस्ट संकलन करणाऱ्या कंपनीसंदर्भातील अहवाल जिल्हाधिकार्‍यांनी मागवला

बायोमेडिकल वेस्ट संकलन करणाऱ्या कंपनीसंदर्भातील अहवाल जिल्हाधिकार्‍यांनी मागवला

सोलापूर — सोलापुरातील बायोमेडिकल वेस्ट संकलन करणाऱ्या कंपनीसंदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मागितला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने भोगाव येथील बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पाची आरोग्य विभागाच्या वतीने पुन्हा तपासणी केली. दोन दिवसांत आरोग्य अधिकारी आणि प्रदूषण महामंडळाच्या वतीने संयुक्त तपासणी होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेस बायोमेडिकल वेस्ट प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाच्या डॉ. मंजिरी कुलकर्णी आणि त्यांच्या पथकांनी प्रकल्पाची तपासणी केली. पस्थिती जैसे थे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी २३ जूनला अचानक तपासणी केली होती. त्यावेळी शेकडो टन बायोमेडिकल वेस्ट प्रक्रिया न करता ठेवल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी आढळून आलेला कचरा केलेल्या तपासणीमध्ये कमी झाल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. मात्र सर्वत्र अद्याप लाल, निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या कॅरीबॅगमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आढळून आला आहे. या पाहणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.

जिल्हाधिकारी या प्रकरणी बैठक घेणार आहेत. त्यामुळे आरोग्य विभागात बैठकीची जोरदार तयारी चालू आहे. दोन दिवसात प्रदूषण महामंडळाचे निखिल मोरे आणि आरोग्य अधिकाऱ्यांची संयुक्त तपासणी मोहिम होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR