25.5 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रबारामतीत फडणवीस यांचा बॅनर पेटविला

बारामतीत फडणवीस यांचा बॅनर पेटविला

तणाव वाढला, पोलिसांनी उतरवला अर्धवट बॅनर
पुणे : प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपला घवघवीत यश मिळाले. दुसरीकडे शरद पवारांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने निवडणूक लढवली. मात्र, मविआचा मोठा पराभव झाला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ १० जागांवर यश मिळाले. त्यामुळे देवाभाऊंनी दाखवून दिलं, देवाभाऊच महाराष्ट्राचे खरे चाणक्य अशी बॅनरबाजी सोशल मीडियात पाहायला मिळाली. मात्र, बारामतीमधील असाच एक बॅनर वादग्रस्त ठरला असून बारामतीत झळकावलेला हा बॅनर एका अज्ञाताने पेटवल्याची घटना घडली. त्यामुळे बारामतीत तणाव निर्माण झाला. त्यानंतर अर्धवट जळालेला बॅनर खाली उतरविण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बारामतीत लावण्यात आलेला बॅनर अज्ञाताने पेटवला आहे. बारामती नगर परिषदेसमोर लावलेला देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरला जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पेटवल्यानंतर तो अर्धा जळाला असून अर्धाच शिल्लक राहिल्याचे दिसून आले. बारामतीत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर भाजपच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चाणक्य असा उल्लेख देखील केला होता. त्यामुळे बारामतीमधील काही अज्ञातांनी हा बॅनर पेटवून दिला. त्यामुळे शहरात तणाव वाढला. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच बारामती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तो उर्वरित बॅनर खाली उतरवला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR