39.4 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeसोलापूरबार्शीच्या माजी नगरसवेकांसह कुटुंबियांवर गुन्हा दाखल

बार्शीच्या माजी नगरसवेकांसह कुटुंबियांवर गुन्हा दाखल

सोलापूर- नगरसेवक पदावर असताना भ्रष्ट व गैर मागनि बेहिशोबी ११ कोटी १२ लाखाची संपत्ती गोळा केली. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांनी लोकसेवक माजी नगरसेवक व त्यांच्या कुटुंबियांवर बार्शी शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. लोकसेवक अक्कलकोटे यास भ्रष्ट मागनि संपत्ती गोळा करण्यास कुटुंबियांनी मदत केली आहे हे चौकशीमध्ये उघड झाले आहे.

नागेश हरिभाऊ अक्कलकोटे (वय ४४ रा. खुरपे बोळ, बार्शी ता बार्शी) व त्याचे कुटुंबिय असे गुन्हा दाखल असलेल्यांची नावे आहेत. अक्कलकोटे यांनी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सन २००१ ते ३१ ऑगस्ट २०२२ या लोकसेवकाच्या कालावधीमध्ये त्यांना मिळणाऱ्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा ११ कोटी १२ लाखाचे जास्तीची संपत्ती मिळावली. त्याची टक्केवारी ही १२२.७७ टके इतकी होत आहे.

अक्कलकोटे यांनी गोळा केलेली ही बेहिशोबी संपत्ती भ्रष्ट व गैरमार्गाने कमविल्याचे माहिती असूनही त्यास कुटुंबियांनी मदत केली. या प्रकरणाचा चौकशीसाठी पोलिस निरीक्षक उमाकांत महाडीक व तपास अधिकारी म्हणून पीआय गणेश पिंगुवाले नियुक्त होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR