लातूर : प्रतिनिधी
शहरातील धोकादायक डिवायडर कमी करण्यात यावेत, या मागणीचे निवेदन रणसम्राट युवक प्रतिष्ठाणच्या वतीने लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त पंजाब खानसुळे यांना देण्यात आले. या संदर्भात रणसम्राट युवक प्रतिष्ठानने आढावा घेतला असून लातूर-बार्शी रोडवरील ५ नंबर चौक ते निकी हॉटेल या एक किलोमीटरच्या अंतरात ८ रस्ता दुभाजक आहेत.
लातूर शहराची संख्या जवळपास सात ते आठ लाखांच्या आसपास आहे. त्यामानाने शहरामध्ये टु व्हिलर, फोर व्हिलर व अन्य गाडयांची संख्या जास्त आहे. शहरामध्ये असे काही डिवायडर आहेत ज्यामुळे रोज दिवसभरात चाळीस ते पन्नास अपघात होत आहेत. तसेच संपूर्ण महिनाभरामध्ये या डिवायडरमुळे दोन ते तीन अपघाती मृत्यू होत आहेत. या सर्व गोष्टीचा रणसम्राट युवक प्रतिष्ठाणने आढावा घेऊन लातूर शहरात किती ठिकाणी अपघाती डिवायडर आहेत हे महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिले यामध्ये ५ नंबर चौक ते निकी हॉटेल, (बार्शी रोड) पर्यंत एक किलो मिटरचा रस्ता आहे. यामध्ये एकूण ८ रस्ता दुभाजक आहेत. हे सर्व डिवायडर महापालिकेने कमी करावेत ज्यामध्ये पहिले डिवायडर कोंबडे पेट्रोल पंपसमोरील डिवायडर ५ नंबर चौक, बार्शी रोड लातूर दुसरे डिवायडर पोलीस अधिक्षक निवासस्थान बार्शी रोड
, तिसरे डिवायडर नवीन जिल्हाधिकारी कार्यालय समोरील रस्ता (बार्शी रोड) चौथे डिवायडर गायत्री हॉस्पीटलकडे जाणारा रस्ता (बार्शी रोड), पाचवे डिवायडर ऑफिस क्लबकडे जाणारा रस्ता, सहावे डिवायडर महिला पॉलिटेक्नीक कॉलेज (बार्शी रोड), सातवे डिवायडर निकी हॉटेल, (बार्शी रोड). सदरील सर्व स्ता दुभाजक धोक्याचे असून तात्काळ बंद करावेत व होणारे अपघात थांबवावेत. या पद्धतीचे निवेदन लातूर महानगरपालिकेचे उपायुक्त पंजाब खानसुळे यांना देण्यात आले.
या प्रसंगी रणसम्राट युवक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रविण बामणकर, उपाध्यक्ष राचप्पा वांगी, सचिन दयानंद कलशेट्टी, सहसचिव अजय शिराळ, कार्याध्यक्ष जयद्रथ शिंदे, विशाल भंडगे, जिल्हाध्यक्ष गायकवाड मोहन, जिल्हा उपाध्यक्ष ओमकार भडंगे, डुमने श्रीनिवास, ऋषिकेश सुर्यवंशी, अभिषेक गायकवाड, अनिकेत भालेराव, संकेत बामणकर, अमित काळे, शेख सोहेल, निलेश राऊत, ज्योतीराम सावंत, ओमकार पाटील, धनंजय गिराम, अमर शिवपुजे, अमोल सोनकांबळे, अनिल धनेराव, दत्ता पोलकर, विकास हराळे, अविनाश गोखले, वैभव जवणे, संतोष भोसले आदि उपस्थित होते.