19.1 C
Latur
Monday, January 27, 2025
Homeलातूरबालरंगभूमी परिषदेतर्फे२० शाळांमध्ये तिरंगा ध्वज वाटप

बालरंगभूमी परिषदेतर्फे२० शाळांमध्ये तिरंगा ध्वज वाटप

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राची कला व परंपरा जपताना बालमनावर संस्कार करत, कलासक्त पण सशक्त पिढी घडवण्याचे कार्य गेली अनेक वर्षे बालरंगभूमी परिषद करते आहे. त्याच अनुषंगाने यंदा आपल्या प्रजासत्ताक दिनाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त बालरंगभूमी परिषदेच्या वतीने २० शाळांमध्ये तिरंग ध्वज वाटप करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनी भारत सरकारने आपले पवित्र संविधान लागू केले. या दोन्हीचे अमृत महोत्सवी वर्ष परिषदेच्या राज्याध्यक्षा अ‍ॅड. निलम शिर्के-सामंत, राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे व प्रदेश कार्यकारिणीच्या सूचनेनुसार लातूर शाखा बालकांसोबत साजरे करत आहे.  दि. २२ ते २६ जानेवारीदरम्यान जिल्ह्यातील २० शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन ७५ ध्वज ७५ विद्यार्थ्यांना वाटप केले जात आहेत. सोबत आपल्या संविधानचेही मुलांसोबत सामूहिक वाचन व शपथ, असा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांमध्ये संविधान व प्रजासत्ताक दिनाबाबत माहितीपूर्ण जागरुकता निर्माण होण्यास मदत होईल.
सदरील उपक्रम म.न.पा. शाळा क्र. ६, लातूर, श्री पुरणमल लाहोटी पाठशाळा लातूर, म.न.पा. शाळा क्र. २८ लातूर, भगतसिंग विद्यालय आष्टा, जिल्हा परिषद विद्यालय आष्टा, शिवाजी विद्यालय आष्टा, रवीशंकर इंग्लिश स्कूल लातूर, रवीशंकर मराठी स्कूल लातूर, राजनंदा विद्यालय लातूर, व्यंकटेश विद्यालय लातूर, श्री. गोदावरीदेवी लाहोटी विद्यालय लातूर, स्टीम एज्युकेशन लातूर, नवभारत विद्यालय लातूर, अंकुर बालविकास केंद्र लातूर, जिल्हा परिषद नवीन चांडेश्वर, जिल्हा परिषद शाळा बोरी, जवाहर विद्यालय लातूर, इरा किड्स औसा, संस्काररत्न विद्यालय लातूर आणि ज्ञानेश्वर विद्यालय, लातूर इत्यादी शाळेत मोठ्या उत्सहात संपन्न झाले आहेत.
या उपक्रमासाठी शाखा अध्यक्षा सुमती बिडवे – सोमवंशी, उपाध्यक्षा हिरा वेदपाठक, उपाध्यक्षा सुवर्णा बुरांडे, कोषाध्यक्ष रवी अघाव, सहकार्यवाह रणजित आचार्य, कार्यकारिणी सदस्य वनिता गोजमगुंडे, रविकिरण सावंत, प्रिती ठाकूर, भिम दुनगावे, महेश पवार, महेश बिडवे, विशाल वाटवडे… सोबत मिनल अष्टेकर, महादेवी हिंगणे, इत्यादी पदाधिका-यानी जिल्ह्यात फिरून हा उपक्रम यशस्वी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR