लातूर : प्रतिनिधी
येथील एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांनी बेंगलुरु येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थाला भेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यांना अंतराळ संस्थेच्या कामकाजाची सखोल माहिती देण्यात आली. यामध्ये उपग्रह तंत्रज्ञान, अंतराळ मोहिमा आणि अंतराळ संशोधना बद्दलही अवगत करण्यात आली. या भेटीअंतर्गत विद्यार्थ्यांना उपग्रहाची रचना आणि तंत्रज्ञानही अभ्यासता आले.
या भेटीत विद्यार्थ्यांना गगनयान, शुक्रायन, चांद्रयान-४ सारख्या इस्रोच्या भविष्यातील मोहिमांचे उद्दिष्टे देखील समजावन्यात आले. या अभ्यास भेटीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव आणि तज्ञ शास्त्रज्ञांशी संवाद यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाबद्दल उत्सुकता आणि आवड निर्माण झाल्याचे अनुभवास
आले. या गटासोबत विभाग प्रमुख प्रा. डॉ. शारदा मुद्दा, तसेच प्रा. रवी खानापुरे यांनी साथ दिली. या यशस्वी उपक्रमाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सौ ज्योती पाटील, उपप्राचार्य प्रा. विरभद्र बाळे यांनी सर्वांचे स्वागत व अभिनंदन केले आहे.