36.3 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रबीडपोलिसांकडून समतेचा संदेश

बीडपोलिसांकडून समतेचा संदेश

बीड : प्रतिनिधी
बीडमध्ये सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे सामाजिक सलोखा बिघडला आहे. याच कारणामुळे आता बीडचे नवीन पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. बीडमध्ये पोलिस अधीक्षकांपासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांच्याच टेबलांवरील आणि छातीवरील नेमप्लेटमधून आडनाव हटवले जाणार आहे. त्याऐवजी फक्त नावाचा वापर केला जाणार आहे.

बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी नुकताच बीडमध्ये एक नवा उपक्रम सुरू केला होता. नवनीत कॉवत यांनी पोलिसांनी एकमेकांना आडनावाऐवजी केवळ नावानेच हाक मारावी, असे सांगितले होते. यानंतर त्यांनी पोलिसांच्या छातीवर असलेल्या नेमप्लेटवरील आडनावंही हटवली होती. यानंतर आता बीड पोलिसांच्या नेमप्लेटसह टेबलावरही फक्त त्यांची नावे आणि पदं नमूद करण्यात आली आहेत. यामुळे बीड पोलिसांचे कौतुक होत आहे.

पोलिसांनी एकमेकांना नावाने हाक मारायची
प्रत्येक जिल्ह्यात तिथल्याच तालुक्यांमधील, गावांमधील तरुण पोलिस खात्यात भरती होत असतात. विविध समाजातील तरुण पोलिसांत सहभागी होतात. ते आपापल्या जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करत असतात. आम्ही पोलिस खात्यात काम करतो. म्हणजेच देशासाठी काम करत असतो. त्यामुळे आमची कुठलीही जात नसते, आमचा कुठलाही धर्म नसतो. आम्ही कुठल्याही नागरिकाला त्याची जात अथवा त्याचा धर्म पाहून न्याय देण्याची भूमिका घेत नाही. यामुळे कर्तव्यामधून जात काढून टाकण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले. त्यापूर्वी आम्ही पोलिसांनी एकमेकांना नावाने हाक मारायचा उपक्रम राबवला. आता पोलिसांच्या नेमप्लेटवरून आडनावं काढून केवळ नावं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली.
आम्ही सर्वांसाठी केवळ खाकी

आमचे पोलिस बीडच्या जनतेसाठी काम करतात. लोकांसाठी आम्ही फक्त पोलिस आहोत. माझा पोलिस अधिकारी, कर्मचारी हा जेव्हा कर्तव्यावर असतो, तेव्हा त्याच्या कामाचा आणि त्याच्या जातीचा काहीच संबंध नसतो. आम्ही सर्वांसाठी केवळ खाकी आहोत. आम्ही कायद्याप्रमाणेच वागणार, असेही नवनीत कॉवत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR