25.2 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeबीडमधील सस्पेन्स संपला; संदीप क्षीरसागरांना उमेदवारी

बीडमधील सस्पेन्स संपला; संदीप क्षीरसागरांना उमेदवारी

राष्ट्रवादी (शरद पवार)चे २२ उमेदवार जाहीर

मुंबई : विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या आधी शरद पवार गटाने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता दुस-या यादीमध्ये एकूण २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. या यादीमधून बीडमधील सस्पेन्स संपला असून संदीप क्षीरसागर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. इतर उमेदवारांची नावे आज रात्री किंवा उद्या जाहीर करण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.
एरंडोल -सतीश अण्णा पाटील
गंगापूर – सतीश चव्हाण
शहापूर – पांडुरंग बरोरा
परांडा – राहुल मोटे
बीड – संदीप क्षीरसागर
आर्वी – मयुरा काळे
बागलाण – दीपिका चव्हाण
येवला – माणिकराव श्ािंदे
सिन्नर – उदय सांगळे
दिंडोरी – सुनीता चारुसकर
नाशिक पूर्व – गणेश गीते
उल्हासनगर – ओमी कलाणी
जुन्नर – सत्यशील शेरकर
पिंपरी – सुलक्षणा शिलवंत
खडकवासला – सचिन दोडके
पर्वती – अश्विनी कदम
अकोले – अमित भांगरे
अहिल्यानगर शहर – अभिषेक कळंबकर
माळशिरस – उत्तम जानकर
फलटण – दीपक चव्हाण
चंदगड – नंदिनी बाभुळकर- कुपेकर
इचलकरंजी – मदन कारंडे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR