बीडमध्ये रंगले खोट्या तक्रारींचे नाट्य

बीड : प्रतिनिधी
कधीही न घडलेल्या गुन्ह्यांचे दाखल झालेले गुन्हे अन् नंतर थेट आमदार धनंजय मुंडेंनी गोळीबार केल्याची तक्रार यामुळे रविवारचा दिवस चर्चेचा आणि बीड पोलिसांना तापदायक ठरला. दिवसभराच्या गोंधळानंतर हा सर्व प्रकार खोटा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले गेले.

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी शिवीगाळ केली, तसेच त्यांच्या पोलिस अंगरक्षकाची पिस्तूल काढून ती आपल्या कानशिलावर लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार समाधान खिंडकर यांनी बीड ग्रामीण पोलिसांत दिली होती. यावरून धनंजय देशमुखांवर गुन्हा नोंद झाला होता. तर याच प्रकरणात धनंजय देशमुख यांनीही समाधान खिंडकर यांनी आपल्याला शिविगाळ केली. त्यांच्याकडे पिस्तूल होते, त्यांनीही जिवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार दिली. त्यामुळे परस्पर विरोधी गुन्हे बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाले होते. या प्रकरणी पोलिस तपास सुरू करण्यात आला होता. मात्र, दिवसअखेर प्रकरणास वेगळे वळण मिळाले.

मुंडेंविरोधातील तक्रार मागे
धनंजय देशमुखांवर समाधान खिंडकर यांच्या तक्रारीवरून दाखल झालेला गुन्हा खोटा असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट केल्यानंतर धनंजय देशमुख यांनी आमदार धनंजय मुंडेंविरोधात दिलेली तक्रार मागे घेतली. यात कुठलाही गुन्हा नोंद केला नाही.

पोलिस अधिका-यांवर कारवाई शक्य
या प्रकरणात यंत्रणांचा गैरवापर करत खोट्या तक्रारी दिल्याने दोन्ही तक्रारदारांवर कारवाई होऊ शकते. सोबतच पुरेशी खात्री न करता गुन्हे नोंद केल्याने किंवा या प्रकरणात हलगर्जीपणा दाखवल्याने बीड ग्रामीण ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई होऊ शकते.

सर्वच गुन्हे खोटे, यंत्रणेचा गैरवाप : पोलिसांचे स्पष्टकरण
या प्रकारानंतर रविवारी दुपारी धनंजय देशमुख यांनी बीड ग्रामीण ठाणे गाठून आमदार धनंजय मुंडे व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी आपल्याला पाली गावाजवळ घाटात अडवले. या वेळी धनंजय मुंडे यांनी दोन गोळ्या पिस्तुलातून फायर केल्या. तर परमेश्वर सातपुते यांनी पिस्तूल कानशिलावर लावल्याची तक्रार दिली. तसेच गुन्हा नोंद करण्यासाठी बीड पोलिस ठाण्यात ठिय्या दिला.

खोट्या गुन्ह्यामुळे देशमुखांकडून मुंडे टार्गेट
आपल्यावर खोटा गुन्हा नोंद होत आहे. पोलिसांनी आधी सीसीटीव्ही व इतर बाबींची पडताळणी करावी. मग योग्य निर्णय घ्यावा, असे धनंजय देशमुख यांनी पोलिसांना रात्री सांगितले. पोलिसांनी त्यांना आम्ही खोटा गुन्हा घेणार नाही, असे आश्वासन देत परत पाठवले. मात्र ते गेल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवला. देशमुख यांनी थेट मुंडे यांच्याविरोधात तक्रार दिली. ज्या प्रमाणे माझ्याबाबत पडताळणी झाली नाही त्याचप्रमाणे आताही पडताळणी न करता गुन्हा नोंद करा अशी भूमिका घेत त्यांनी पोलिसांना कोंडीत पकडले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
भाडेकरार मोडून शेतकऱ्यांची फसवणूक; 'टी.एस. विंड पॉवर' कंपनीच्या विरोधात तहसीलसमोर आमरण उपोषण
02:14
Video thumbnail
लातूर-बार्शी रोडवरील 'मोटेगावकर' यांचा कोट्यवधींचा प्लॉट चर्चेत; सीबीआयच्या रडारवर बेनामी मालमत्ता?
03:12
Video thumbnail
पीक विम्याचा घोळ: शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; जिल्हा कृषी अधीक्षकांना जमिनीवर बसवून केले आंदोलन
04:25
Video thumbnail
धाराशिव-बीड-लातूर विधान परिषद निवडणूक: बसवराज पाटील आणि महेश देशमुख यांच्यात थेट लढत; अर्ज दाखल
02:06
Video thumbnail
अमर राजूरकर यांचा भाजप कडून उमेदवारी अर्ज दाखल; ३०० पार मतांचा विश्वास
06:35
Video thumbnail
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद लाइव्ह
16:58
Video thumbnail
नांदेड जिल्ह्यात वादळी पावसासह अर्धापुरात गारपीट; उद्याही 'येलो अलर्ट' कायम
01:34
Video thumbnail
Latur|राजमाता अहिल्यादेवींचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत : दिलीपराव देशमुख
05:50
Video thumbnail
Latur|लातूर रेल्वे स्थानकाच्या विकासाला वेग; बहुप्रतीक्षित पिटलाईन डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार
02:27
Video thumbnail
Nanded|तारण ठेवलेल्या सोन्यावरच बँक अधिकाऱ्यांचा डल्ला; SBI मधील 85 लाखांचा घोटाळा उघड
03:58
Video thumbnail
Latur|लातुरात अहिल्यादेवी जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
04:21
Video thumbnail
मास्टर ब्लास्टरचा पाककौशल्य 'सिक्सर'; सचिन तेंडुलकरने बनवले खास उकडीचे मोदक
00:40
Video thumbnail
थिएटरच्या स्क्रीनमधून थेट स्कॉर्पिओ बाहेर! व्हिडिओ पाहून प्रेक्षकांची धांदल
00:18
Video thumbnail
अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याची दृश्ये कॅमेऱ्यात कैद; पहा 'क्लिअर' व्हिडिओ
00:30
Video thumbnail
मराठा आरक्षण आंदोलन; सरकारच्या सकारात्मक भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले उपोषण
00:56

Latest news