29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रबीडसाठी इतकी वर्षे काम केले

बीडसाठी इतकी वर्षे काम केले

मंत्री पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत

मुंबई : प्रतिनिधी
मी बीडची लेक आहे. बरेच वर्ष मी बीडमध्ये काम केले आहे. मला बीडचे पालकत्व मिळाले असते तर आनंदच झाला असता. बीडचे पालकमंत्रिपद न मिळाल्याने अशी नाराजी सोमवारी (२०जानेवारी) प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, नुकतेच राज्य सरकारने पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केली. यामध्ये बीडचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले. सरकारने यादी जाहीर करताच महायुतीमध्ये धुसपूस सुरू असल्याचे समोर आले आहे.

सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, जालना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळालेले आहे. मला चांगला प्रतिसाद मिळत असून बरेच लोकं उत्साहात आहेत. मला मिळाली संधी ही मी एक अनुभव म्हणून घेत असते. प्रत्येकवेळी तुम्हाला सारखेच काम करायला मिळते, असे होत नाही. ५ वर्षे मी कोणत्याही पदावर नसताना पूर्णत: संघटनेचे काम केले. मी बीडची लेक आहे, मला बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती तर अजून आनंद झाला असता. बीडकरांनाही खूप आनंद झाला असता. असे म्हणत त्यांनी आपली खदखद बोलून दाखवली.

मंत्री पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, माझ्या ५ वर्षातील कार्यकाळ हा सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे. हा कोणत्याही विचाराचा व्यक्ती मान्य करेल. पण आता जो निर्णय घेण्यात आला, त्या निर्णयाबद्दल कोणतीही असहमती न दर्शवता आपल्याला जे मिळाले आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त चांगले काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी आहे. तसेच, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मी आनंदी आहे. पण आता मला जालना आणि बीड असे दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल. पालकमंत्री अजित पवार आहेतच, पण इतकी वर्षे मी तिथे काढल्यामुळे अजितदादा आम्हाला तिथे पूर्ण सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आता अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR