बीड : प्रतिनिधी
बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशातच बीडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रेमप्रकरणातून शॉट फिल्म बनवणा-या युवकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. वार इतके जोरदार करण्यात आले होते की, यात तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मृत तरूणाच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
बीडच्या अंबाजोगाईत १ एप्रिल रोजी एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या प्रेम प्रकरणातून शॉट फ्लिम बनवणा-या युवकावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. राजकुमार साहेबराव करडे (वय वर्ष २५) असे तरूणाचे नाव आहे. आरोपींनी तरूणावर कोयत्याने गळ्यावर, डोक्यावर आणि पाठीवर सपासप वार केले.
या हल्ल्यात तरूण रक्तबंबाळ झाला होता. गंभीर अवस्थेत त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मृत तरूणाच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच ४ आरोपींविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यानंतर ५ मार्चला आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. या प्रकरणात ज्या तरूणीच्या भावाने कोयत्याने वार केले, त्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे.