24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रबीसीए, बीबीए, बीबीएमसाठी सीईटी अनिवार्य

बीसीए, बीबीए, बीबीएमसाठी सीईटी अनिवार्य

मुंबई : प्रतिनिधी
बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमांसाठी आता सीईटी परिक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ पासून बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.

गुरुवार, दि. २१ मार्चपासून अर्ज नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे. महा-बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२४ सामाईक प्रवेश परीक्षा प्रथमच महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. नोंदणी अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ एप्रिल २०२४ पर्यंत देण्यात आली आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम हे अभ्यासक्रम एआयसीटीईने आपल्या कक्षेत घेतले आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांना सीईटी लागू करण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्षे २०२४-२०२५ करिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. त्यानुसार या शैक्षणिक वर्षापासून बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना सीईटी देणे बंधनकारक असणार आहे. उमेदवार, पालक संबंधित संस्था यांच्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट महासेट डॉट ओआरजीवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

परीक्षेची संकेत
स्थळावर माहिती
महा-बी. बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२४ या सामाईक प्रवेश परीक्षेचा दिनांक निश्चित झाल्यानंतर उमेदवार व पालकांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक असणार आहे.

असा अर्ज करावा लागणार
सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, होम पेजवर दिलेला बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम सीईटी टॅब निवडा. नोंदणी लिंकवर क्लिक करा. उमेदवारांना नोंदणी पूर्ण करावी लागेल. महत्त्वाची ओळखपत्रे भरून फॉर्म पूर्ण करा आणि कागदपत्रे सबमिट करा. आवश्यक फी भरा आणि पेमेंट पावती डाउनलोड करा, असे सांगण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR