मुंबई : वृत्तसंस्था
एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी नेटफ्लिक्सच्या ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेबसिरीजविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी नेटफ्लिक्स आणि शाहरूख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेन्मेंट यांच्या विरोधात ही मानहानीची याचिका दाखल केली आहे.
या याचिकेनुसार, वेबसिरीज बॅड्स ऑफ बॉलिवूड’मधील एका पात्राचे नाव ‘समीर वानखेडे’ असे आहे. या पात्राच्या माध्यमातून एनसीबी आणि वानखेडे यांची मानहानी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
‘सत्यमेव जयते’ची विटंबना झाल्याचाही दावा
वेबसिरीजमध्ये ‘सत्यमेव जयते’ हा डायलॉग बोलल्यानंतर आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आल्यामुळे ‘सत्यमेव जयते’ची विटंबना झाल्याचाही दावा याचिकेत करण्यात आला आहे. या मानहानीचा दावा जवळपास २ कोटी रुपयांचा असून, ही रक्कम मिळाल्यास ती कर्करोगाच्या रुग्णांना मदत करण्यासाठी वापरली जाईल, असेही याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी लवकरच होणार आहे.