24 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeराष्ट्रीयबेपत्ता असलेल्या सिक्कीमच्या माजी मंत्र्यांचा मृत्यू

बेपत्ता असलेल्या सिक्कीमच्या माजी मंत्र्यांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये मिळाला मृतदेह

गंगटोक : गेली अनेक दिवस बेपत्ता असलेले सिक्कीमचे माजी मंत्री आर. सी. पौड्याल यांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील सिलीगुडीजवळील कालव्यात त्यांचा मृतदेह मिळाला. मागील नऊ दिवसांपासून बेपत्ता झाल्यामुळे आर. सी. पौड्याल यांच्या शोधासाठी सिक्कीम सरकारने एसआयटी स्थापन केली होती. मात्र सर्व शोधाशोध करूनही त्यांचा कुठेही पत्ता लागला नव्हता. दरम्यान मंगळवारी त्यांचा मृतदेह कालव्यात आढळून आला. पौड्याल यांच्या मृत्यूमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिक्कीमचे माजी मंत्री आर. सी. पौड्याल हे ८० वर्षांचे होते आणि गेल्या नऊ दिवसांपासून त्यांचा शोध घेण्यात येत होता. मंगळवारी त्याचा मृतदेह सिलीगुडीतील फुलबारी येथील तीस्ता कालव्यात तरंगताना आढळून आला. घड्याळ आणि कपड्यांवरून पौड्याल यांची ओळख पटली. ते ७ जुलै रोजी पाकयाँग जिल्ह्यातील त्यांच्या गावी छोटा सिंगटम येथून बेपत्ता झाले होते.

यामुळे त्यांच्या शोधासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करण्यात आली होती. माजी मंत्री पौड्याल यांच्या मृत्यूमागचे कारण आणि कोणत्या परिस्थितीत हा मृत्यू झाला याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. पौड्याल हे सिक्कीम विधानसभेचे उपसभापती होते. त्यानंतर ते राज्याचे वनमंत्रीही राहिले. पौड्याल हे ७०-८० च्या राजकारणातील एक मोठे नाव होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR