लातूर : प्रतिनिधी
या आठवड्यात दुस-यांदा बेमोसमी पावसाने हजेरी लावली. मंगळवारच्या पावसानंतर पुन्हा गुरुवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडला. या पावसाने शहरातील पापविनाश रोडच्या दुतर्फा गटारी तुंबून घाण पाणी व कचरा रस्त्यावर आल्याने या रस्त्याने ये-जा करणा-यांना कसरत करावी लागली. हमालगल्लीतही गटारीतील घाण, कचरा, पाणी रस्त्यावर आले. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाचा सामना लातूरकरांना मंगळवार दि. १ एप्रिल रोजी रात्री झालेल्या पावसाने दिलासा मिळाला होता. बुधवारी पुन्हा उन्हाचा पारा अस करणारा ठरला. गुरुवारी अगदी सकाळपासूनच सूर्य आग ओकत होता. सूर्यास्तानंतर काही वेळाने बेमोसमी पावसाचे आगमन झाले.
पाहता पाहता संपुर्ण शहरभर पावसाने धुमाकुळ घातला. शहरातील बालाजी मंदीरच्या पाठीमागुन जुना रेणापुर नाक्याकडे जाणा-या रोडच्या दुतर्फा गटारी तुबूून गटारीतील घाण पाणी, कचरा रस्त्यावर पसरला. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणा-यांना कसरत करावी लागली. हलामगल्लीचीही तीच अवस्था झाली. गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढले आहे. ३७ ते ३८ अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान जात आहे. सकाळी सूर्याेदयापासूनच उन्हाची तीव्रता अधिक होते. दुपारच्या वेळी तर ही उन्हाची तीव्रता अधिक होते. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यातच १ एप्रिलपासून जिल्ह्यात पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. मंगळवारी दिवसभर दमट हवामान होते. सायंकाळी ढगाळ वातावरण झाले. रात्री सातच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. गुरुवारीही सायंकाळी ब-यापैकी पाऊस पडला. वीजांचा कडकडाट होता. आकाशात ढगांची गर्दी होती. ब-यापैकी पाऊस पडल्यानंतर काही वेळ थांबला परंतू, रात्री उशिरापर्यंत पावसाची रिमझिम सुरुच होती.