30.3 C
Latur
Monday, April 28, 2025
Homeलातूरबेलकुंडचे सुपुत्र पोलिस निरीक्षक माने यांना सन्मान चिन्ह

बेलकुंडचे सुपुत्र पोलिस निरीक्षक माने यांना सन्मान चिन्ह

औसा  : प्रतिनिधी
अत्यंत प्रतिकूल परिस्थतीचा सामना करून पोलीस दलात भरती झालेले औसा तालुक्यातील बेलकुंड येथील सुपुत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग व्यंकट माने यांना महाराष्ट्र पोलीस दलात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह (मेडल) जाहीर झाले आहे.  माने यांनी  पोलिस दलात  गडचिरोली, धाराशिव या जिल्ह्यात काम केले असून सध्या ते  नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत.
एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले पांडुरंग माने हे प्रथम सोलापूर राज्य राखीव पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाले होते. त्यानंतर एमपीएससी अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी यश संपादन केले. यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात त्यांनी सेवा बजावल्यानंतर धाराशिव येथे स्थानिक गुन्हे शाखेत चमकदार कामगिरी केली.   यानंतर त्यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाल्यानंतर नांदेड गुन्हे शाखेत चमकदार कामगिरी बजावली सध्या ते नांदेड ज् ियातील सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत.
पोलीस विभागामध्ये सलग पंधरा वर्ष उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे तसेच मागील दहा वर्षांची सेवा पुस्तकातील शेरे अ+ (अति उत्कृष्ट) असल्याबद्दल पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. या कामगिरीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील खडतर तीन वर्षाची सेवा तसेच धाराशिव जिल्ह्यातील गुन्हे विभागामध्ये उत्कृष्ट कामगिरी तसेच नांदेड जिल्ह्यातील गुन्हे शाखेमध्ये उत्कृष्ट कामगिरीसह विविध गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगारांनी पोलीस पथकावर गोळीबार केल्यानंतर त्यांना प्रतिउत्तरादाखल  व संरक्षणार्थ गोळीबार करून अटक केले असून अशा विविध कामगिरीबद्दल सदर पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR