लातूर : येथील औसा रोडवरील गोदावरी स्वीट होमच्या पलीकडच्या बाजूला रस्ता ओलांडणा-या एका इसमाच्या अंगावरून औसा डेपोची एम. एच.०९-ईएम-८७५२ क्रमांकाची शिवशाही एस. टी. बस गेल्याने त्या इसमाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि. ६ नोव्हंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
हा इसम एका किराणा दुकानातून पिशवीमध्ये काही तरी साहित्य घेवून दुभाजकातील जाळीवरून रस्त्याच्या पलीकडे जात होता. या दरम्यान एक दुचाकी आली त्याने त्या इसमास धडक दिली आणि तो निघून गेला, असे सांगण्यात येते. त्याचवेळी लातूरहून निलंगाकडे जाणारी शिवशाही बस आली त्या बसने त्या इसमास चिरडले. काही वेळानंतर पोलिसांनी त्याचे प्रेत शवविच्छेदनासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेले. हा व्यक्ती सुनील गोविंदराव वतनेवकील असल्याचे निदर्शनास येत असून आधार कार्डवर त्यांचा पत्ता अंबुलगा बु. लातूर असा दर्शविण्यात आला आहे.

