31 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरबैलपोळा सण संस्कृती म्हणजे कृषि व गोवंश समृद्धीचा संकल्प

बैलपोळा सण संस्कृती म्हणजे कृषि व गोवंश समृद्धीचा संकल्प

लातूर : प्रतिनिधी
भारतीय कृषि संस्कृतीमध्ये पूर्वापारपासून शेतीपूरक गोवंशाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. बळीराजा हा गोपालक असून, गोधनाला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच मानतो. कृषि संस्कृतीमध्ये गोधनाचे योगदान पाहता त्यांच्याविषयी आपल्या मनात कृतज्ञतेच्या भावना जोपासणे हे आद्य कर्तव्य आहे असे उद्गार कृषि महाविद्यालय लातूर व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लातूरचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी काढले.
ते कृषि महाविद्यालय लातूर अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘बैलपोळा’ सण सोहळ्याच्या निमित्ताने बोलत होते. डॉ. बाबासाहेब ठोंबरे पुढे बोलताना असेही म्हणाले की, सेंद्रिय शेतीसाठी गोवंशाचे योगदान व महत्त्व जगमान्य आहे. यातूनच मानव व पशु धनाला निरामय आरोग्य लाभत असे. एकंदरीत बैलपोळा सण संस्कृती म्हणजे गोवंश वद्धीचा संकल्प होय.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. दिनेशस्ािंह चौहान, डॉ. प्रशांत करंजीकर, डॉ. अच्युत भरोसे, डॉ. आनंत शिंदे, डॉ अनिलकुमार कांबळे, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर सदर, आदिनाथ फाळके, रावसाहेब आडे, दादाराव झुंजारे, माधव शिंदे, लक्ष्मण खटिंग व विभागातील विद्यार्थ्यानी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR