लातूर : प्रतिनिधी
रिड लातूर अंतर्गत मुलांना वाचनची आवड निर्माण व्हावी म्हणून रिड लातूर चळवळ दीपशिखा धिरज देशमुख यांच्या संकल्पनेतून चळवळ साकारली आहे. गेल्या तीन वर्षांपासून ती राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने बोकनगाव येथील शाळेस रिड लातूरचा पुरस्कार मिळाला आहे.
हा पुरस्कार लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, रिड लातूरच्या प्रणेत्या दीपशिखा देशमुख, गटशिक्षणाधिकारी निवृत्ती जाधव, औसा गटशिक्षणाधिकारी राठोड, रिड लातूरचे समन्वयक राजू पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्र प्रमुख कमलताई पाटील. आलमला येथील केंद्र प्रमुख आर.के जाधव, मुख्याध्यापक सुवर्णकार, प्रभाकर जाधव , संजीव सूर्यवंशी, अंकुश गोमारे, आशा इरे, मृणाली पाटील उपस्थित होते.