20 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeहिंगोलीबोलोरोची दुचाकीला जबर धडक; दोन जागीच ठार

बोलोरोची दुचाकीला जबर धडक; दोन जागीच ठार

सेनगाव (तालुका प्रतिनिधी)
सेनगाव येथील इंद्रप्रस्थ हॉटेल जवळीत वळणाऱ्या रस्त्यालगत तोष्णीवाल महाविद्यालयाजवळ काल दिनांक 30 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बोलोरो पिकअपने लघुशंकेसाठी उभ्या असलेल्या दोघांना जोराची धडक दिल्याने त्या अपघातात भानखेडा येथील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की त्यांना तालुक्यातील सेनगाव हिंगोली रोड ने बोलोरो पिकप चालक यांनी आपल्या ताब्यातील बोलोरो पिकप भरधाव वेगाने व निष्कळजीपणाने चालवत असताना तोष्णीवाल महाविद्यालय जवळी इंद्रप्रस्थ हॉटेलच्या वळणावरील रस्त्यावर भानखेडा येथील दोन मजूर आपले दिवसभराचे काम आटपून आपल्या गावी भानखेडा जात असताना त्या दोघांना लघुशंका करण्यासाठी ते तोष्णीवाल महाविद्यालयाच्या व इंद्रप्रस्थ हॉटेलच्या वळणावर थांबले असता बोलोरो पिकअप ज्याचा क्रमांक एम एच 38 इ 25 58 या क्रमांकाचा पिकअप चालक यांनी आपल्य ताब्यातील बोलोरो पिकअप भरधाव वेगाने चालून व निष्काळजीपणाने चालवून उभ्या असलेले मयत शेख महंमद शेख महबूब व 54 वर्षे व विजय राजू अंभोरे वय 20 वर्षे दोघे राहणार भानखेडा ता सेनगाव जि हिंगोली हे लघुशंकासाठी थांबले असता सेनगाव कडून हिंगोली कडे जाणारे बोलोरो पिकअप यांनी जोराची धडक दिल्याने भानखेडा येथील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 30 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे घडलेल्या घटनेत दुचाकी क्रमांक एम एच 38 पी 9440 हिला जोराची धडक दिल्याने मोटरसायकलचे 20 हजार रुपये नुकसान झाले असल्याची माहिती सेनगाव पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घडलेल्या घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मयत यांचा व घटनेचा पंचनामा करून फिर्यादी शेख वाजिद शेख रहीम वय 26 वर्ष रा भानखेडा यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस स्टेशन मध्ये आरोपी बोलोरो पिकअप क्रमांक एम एच 38 इ 25 58 या क्रमांकाच्या चालक नाव गाव माहित नाही याच्या विरुद्ध शेनगाव पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर 441/2023 कलम 279, 304( अ ) 427 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील घटनेचा तपास सेनगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस बी स्वामी हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR