32.3 C
Latur
Tuesday, May 20, 2025
Homeमहाराष्ट्रभरधाव बसने चौघांना उडवले; २ ठार, २ गंभीर

भरधाव बसने चौघांना उडवले; २ ठार, २ गंभीर

जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील चोपडा शहरात स्वस्तिक टॉकीज परिसरात भीषण अपघाताची घटना घडली असून दुर्घटनेत २ जण जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी आहेत. येथे महामंडळाच्या एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर, जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकीस्वारांसह ४ जणांना चिरडले आहे. या अपघातात दोन जण ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. रवींद्र बहारे (वय ४० वर्षे) व सोनू रशीद पठाण (वय २२ वर्षे) अशी अपघातातील मृतांची नावे असून तर अनिता बहारे व शाकीर शेख हे दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

ब्रेक फेल झालेल्या बसने दुचाकीला चिरडल्यानंतर एका रिक्षाला देखील धडक दिल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर स्थानिकांसह आमदार चंद्रकांत सोनवणे यांनीदेखील घटनास्थळी भेट दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR